Ticker

6/recent/ticker-posts

बिहार निवडणुकीत धडाडणार 'ठाकरी' तोफा; उत्सुकता शिगेला

मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ताकदीनं उतरली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेनं २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख व पर्यावरण मंत्री यांचाही समावेश आहे. 'ठाकरी' तोफा धडाडणार असल्यानं प्रचाराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं ५० उमेदवार उतरवले आहेत. प्रचारासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आली आहे. त्यात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, संजय राऊत व चंद्रकांत खैरे या नेत्यांचाही समावेश आहे. याशिवाय, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योजराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. वाचा: महाराष्ट्रात युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. त्यातच सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलीस व सरकारवर आरोप करत बिहारमधील भाजप व संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी वातावरण चांगलेच तापवले होते. सुशांत मृत्यू प्रकरणाला बिहारच्या अस्मितेशी जोडण्यात आलं होतं. तसे पोस्टरही प्रसिद्ध झाले होते. बिहारमधील सत्ताधारी जेडीयू व भाजपकडं दुसरे काही मुद्दे नसल्यानंच हे प्रकरण तापवलं जात असल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य विरोधकांनी केला होता. सुशांतसिंहनं आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेनं अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या राजकारणाचा पर्दाफाश करण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. वाचा: बिहार निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. दुसरा व तिसरा टप्पा अनुक्रमे ३ व ७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर, निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33HtsDc

Post a Comment

0 Comments