
मुंबई- हिला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे. उच्च न्यायालयाने शौविकची जामीन याचिका फेटाळून लावली. शौविक ड्रग्ज डिलर्सच्या थेट संपर्कात होता, असं कारण देत न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. शौविकच्या समस्या अजूनही कमी झाल्या नाहीत रियाला २८ दिवसांनंतर ७ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र तिच्या भावाच्या अडचणी अद्याप कमी झाल्या नाहीत. न्यायालयाने मान्य केलं की शौविक ड्रग्ज डिलरच्या सतत थेट संपर्कात होता आणि त्यांच्याशी व्यवहारही करत होता. या टप्प्यावर, एनसीबीकडे अनेक पुरावे आहेत जे शौविक ड्रग्ज डिलींगमध्ये सामिल होता हे सिद्ध होतं. न्यायमूर्ती सारंग कोतवाल म्हणाले की, ड्रग्ज डिलरच्या साखळीतील शौविक हा महत्त्वाचा दुवा आहे. रियावर असे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. शौविक ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता शौविकच्या खात्यातून 'वीड' विकत घेण्यासाठी पैशांचा व्यवहार झाल्याचं न्यायालयाने नोंदवलं. हायकोर्टाने सांगितले की, सुशांतला शौविकच ड्रग्ज पुरवायचा. तो ड्रग्जच्या अवैध व्यापारातहही सामील होता. शौविकवर ड्रग्ज पेडलर्स अनुज केशवानी आणि परिहार यांच्यासोबत सामील असल्याचा आरोप आहे. यामुळेच शौविक चक्रवर्तीची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SzXnXg
0 Comments