
नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात २७ नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची टी-२० मालिका होईल. तर १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर तो भारतात परतणार आहे. दरम्यान भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीवरून बराच वाद झाला होता. रोहित शर्माच्या निवडीवरून बराच गोंधळ घातल्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान दिले गेले होते. पण आता आणि हे दोघेही कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेसवर काम करत आहेत. वाचा- काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने हे स्पष्ट केले होते की या दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवले आहे. दोन्ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या आधी दोघे फिट होतील. आता या संदर्भात मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हे दोघे कसोटी मालिकेपर्यंत फिट होणार नाहीत. रिपोर्टच्या वृत्तानुसार रोहित आणि इशांतच्या फिटनेसवर एनसीएमधील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही खेळडूंची फिटनेस रिपोर्ट फार समाधानकारक नाही. याची माहिती संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि बीसीसीआयला देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आणि इशांत कदाचितच कसोटी मालिका खेळू शकतील. याबाबतची अधिकृत घोषणा लवकर केली जाऊ शकते. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघाची निवड झाली तेव्हा रोहित शर्माचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर तो आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यात रोहित खेळला होता आणि मग त्याची निवड फक्त कसोटी संघात झाली होती. कालच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांतच्या दुखापतीबद्दल एक महत्त्वाचे विधान केले होते. जर रोहित आणि इशांत दोन दिवसात ऑस्ट्रेलियात पोहोचले नाही तर ते मालिकेला मुकू शकतात. शास्त्रींच्या वक्तव्यातून रोहित आणि इशांत कसोटी मालिकेला मुकणार असल्याचे संकेत मिळाले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/376pZhV
0 Comments