
कॅराकस: खनिज तेलाचा सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक असलेल्या देशाचे दिवस फिरले आहेत. मागील काही वर्षांपासून व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. बाजारात येताना नागरिकांना बॅगा भरून नोटा आणाव्या लागत असल्याचे चित्र आहे. चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे आता सरकारकडून मोठ्या मुल्याच्या नोटा छापण्यात येणार आहेत. सरकार आता छापण्याची तयारी करत आहे. 'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएला सरकार एक लाख बोलिवर नोटा छापणार आहे. ही नोट आतापर्यंतची सर्वात मोठी चलनी नोट असणार आहे. या नव्या नोटा छापण्यासाठी सरकारने इटलीतून ७१ टन खास कागद आयात केला आहे. जगभरातील अनेक देश या कंपनीकडून नोटा छापण्यासाठी कागद आयात करतात. वाचा: व्हेनेझुएलामध्ये एक लाख बोलिवर नोट ही सर्वाधिक चलनी मूल्याची नोट असणार आहे. याचे मूल्य ०.२३ डॉलर इतकेच असणार आहे. इतक्या रुपयांमध्ये व्हेनेझुएलात फक्त दोन किलो बटाटे आणि पाव किलो तांदूळ खरेदी करता येणार आहे. त्यावरून व्हेनेझुएलातील महागाईची परिस्थिती लक्षात येईल. वाचा: सलग सातव्या वर्षी मंदी करोना विषाणूचा संसर्ग आणि खनिज तेल विक्रीतून मिळणारे उत्पन्न घटले असल्यामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सलग सातव्या वर्षी मंदीच्या फेऱ्यात आहे. यावर्षीदेखील अर्थव्यवस्था २० टक्के घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा: अर्थव्यवस्था बिकट अवस्थेतव्हेनेझुएलाला देशातील सोने विक्री करून सामान खरेदी करावे लागत आहे. व्हेनेझुएलात अन्न संकट गडद झाले असून लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तीन पैकी एका नागरिकाकडे खाण्यासाठी अन्न नसल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. करोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. का ओढावली अशी परिस्थिती? व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात संपन्न देश होता. जगातील पाचव्या क्रमांकाचा तेल साठा व्हेनेझुएलाकडे आहे. सोने आणि हिऱ्यांच्या खाणी आहेत. मात्र अर्थव्यवस्था ही तेल व्यापारावर अवलंबून आहे. सरकारला ९० टक्क्यांहून अधिक उत्पन्न तेलातून मिळते. व्हेनेझुएलात १९९८ मध्ये ह्युगो शावेझ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरकारी धोरणात मूलभूत बदल करत समाजवादी अर्थव्यवस्था स्विकारली. शावेझ यांनी अनेक उद्योगांचे राष्ट्रीयकरण केले. तेलातून मिळणारे उत्पन्न विविध योजनांसाठी खर्च केले. त्यासाठी कर्ज देखील घेतले. मात्र, शावेझ यांच्या निधनानंतर व्हेनेझुएलासमोर संकटे उभी राहिली. अमेरिकेचे निर्बंध आणि खनिज तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने व्हेनेझुएलाला त्याचा मोठा फटका बसला. शावेझ यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेले मादुरो यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हेनेझुएलाच्या अडचणी चलनाचे घटते मूल्य, वीज कपात आणि मूलभूत आणि जीवनाश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. व्हेनेझुएलात जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी वीज वापरली जाते. पाच वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळामुळे वीज निर्मिती घटली. वीज संकट अधिक मोठे झाले की २०१६ मध्ये फक्त दोनच दिवस सरकारी कार्यालयात कामकाज सुरू असेल असा निर्णय घेण्यात आला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30GBqKz
0 Comments