Ticker

6/recent/ticker-posts

...म्हणून भाजपनं गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं: अनिल देशमुख

मुंबई: बिहारचे माजी पोलीस महासंचालक यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यास भाजपनं नकार दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री यांनी भाजपला टोला हाणला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळं गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते. सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस योग्य तपास करत नसल्याचा व ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात पांडे हे महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करत होते. त्याचवेळी गुप्तेश्वर पांडे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. बिहार निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. कालांतरानं गुप्तेश्वर पांडे यांनी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला. त्यामुळं त्यांना जेडीयूचं तिकीट मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. आता भाजपनंही त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला आहे. वाचा: अनिल देशमुख यांनी त्यावरून भाजपला चिमटा काढला आहे. 'गुप्तेश्वर पांडेंना भाजपनं उमेदवारी द्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का, असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्याचं उत्तर भाजपकडं नसावं. त्याच भीतीतून त्यांनी पांडेंना तिकीट नाकारलं असावं, असं देशमुख म्हणाले. आणखी वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nu9VOk

Post a Comment

0 Comments