Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं काय दिलं? शंतनू मोघेनं शेअर केला खास अनुभव

मुंबई: अभिनेता यानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिका आणि त्यानं साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. प्रेक्षकांच्या या प्रेमाचा प्रत्यय त्याला पुन्हा एकदा आला. एका रिक्षाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणाऱ्या शंतनूचा फोटो लावण्यात आला होता. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. वाचा: वाचा: ‘कामाची पावती अशी ही.. जनमानसाचा पुरस्कारच जणू.. स्वरुप वेगळं. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाज महाराज यांची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं अहोभाग्य. मायबाप रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. तेव्हा अनेक मित्र-मैत्रिणींनी असे फोटो मला पाठवले. वेगवेगळ्या ठिकाणी, ट्रॅफिकमध्ये असताना रिक्षावर दिसलेलं हे चित्र. मनोमन सुखावून गेलो. मनात आलं, आपल्यालासुद्धा हे चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळेल का? आणि एके दिवशी मी सिग्नलवर गाडीत असताना प्रियानं मला अचानक समोरची रिक्षा दाखवली. पटकन गाडीतून उतरलो आणि एक फोटो काढला. हा मोह आवरू शकलो नाही’, अशा शब्दांत शंतनूने कृतज्ञता व्यक्त करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Ka5KYY

Post a Comment

1 Comments

  1. खूप छान माहिती आहे. आमच्या ब्लॉग ला pn नक्की भेट द्या

    ReplyDelete