Ticker

6/recent/ticker-posts

अमेरिकाही म्हणते, फायजरची लस प्रभावी! पण...

वॉशिंग्टन: ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकावव करण्यासाठी फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने लशीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. फायजरकडून मिळालेला डेटा हा अन्न आणि औषध प्रशासनाने जारी केलेले निर्देश, मार्गदर्शक तत्वांनुसार आहे. अमेरिकेत १६ वर्षावरील व्यक्तिंना लस देण्यात येण्याची शक्यता आहे. लस प्रभावी पण सुरक्षितेवर प्रश्न FDA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फायजरच्या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसानंतर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. सध्या मात्र, १६ वर्षाखालील मुले, गरोदर महिला आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना लस दिल्यास ती सुरक्षित असेल का, याबाबतचा निर्णय घेण्यास आवश्यक डेटा नसल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: लस मंजुरीवर निर्णय कधी? फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीचा वापर करण्यासाठी FDAकडे परवानगी मागितली आहे. या लशीचा वापर आपात्कालीन परिस्थितीत करण्यासाठी मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत फायजरसह, मॉडर्नानेदेखील परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. फायजरच्या लशीला १० डिसेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता त्याला आणखी काही दिवसांचा अवधी जाण्याची शक्यता आहे. तर, नाताळापूर्वी अमेरिकेत दोन लस उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा: भारताला लस मिळणार? फायजरने भारतातही लस वापराच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, भारतात कोल्ड स्टोरेजची मोठी समस्या असल्याचे म्हटले जात आहे. फायजरची लस -७० अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात ठेवणे आवश्यक आहे. पीपल्स हेल्थ मुव्हमेंटचे टी. सुंदररमन यांनी सांगितले की, भारतात -७० अंशाखाली लस ठेवणे अशक्य आहे. सध्या भारतात असलेल्या कोल्ड चेनमध्ये तीन वर्षांखालील मुलांसाठी लस ठेवण्यासाठीची अधिक सुविधा उपलब्ध नाही. या लशींच्या तुलनेने करोना लशीची मागणी कित्येक पटीने अधिक आहे. भारत सध्या कोल्ड-चेन यंत्रणा वाढवू शकत नाही. कमी तापमानाशिवाय अतिशय कमी वेळेत लस वितरण करणेदेखील आव्हानात्मक असणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याआधीच स्पष्ट केले होते. लशीकरणासाठी पॅरामेडिकल स्टाफला प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. दुर्गम भागातील लशीकरण केंद्रात लस पाठवणेही कठीण असणार आहे. लस वितरणाचा अधिक खर्च लक्षात घेता विकसनशील देश कितपत फायजरची लस घेतील याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VV1AXo

Post a Comment

0 Comments