
: देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या एका जवानाचा अचानक खोल दरीत पडून मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे, आठ महिन्यांच्या गर्भार पत्नीवर व्हिडिओ कॉलवरूनच आपल्या पतीला डोळे भरून पाहण्याची वेळ आली. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जाव्या लागणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. अशापैंकीच हा एक प्रसंग अनेकांच्या अंगावर शहारे उभे करणारा ठरला. दरीत पडून मृत्यू मूळचे हिमाचल प्रदेशातील जिल्ह्यातील भागाचे रहिवासी असलेले बिलजंग गुरुंग यांना ग्लेशियर भागात हौतात्म्य आलं. ३ डिसेंबर रोजी अतिशय वादळी हवामानात आपल्या पोस्टची देखरेख करता करताच अचानक एका खोल दरीत कोसळल्यानं बिलजंग गुरुंग यांचा मृत्यू झाला. इतर जवानांनी मोठ्या शर्थीनं बिलजंग गुरुंग यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश मिळवलं. परंतु, बिजलंग यांचा आधीच मृत्यू झाला होता. पत्नी आठ महिन्यांची गर्भार बिलजंग गुरुंग हे गोरखा रायफलमध्ये तैनात होते. बिलजंग गुरुंग यांची पत्नी दीपा गुरुंग या आठ महिन्यांच्या गर्भार आहेत. सध्या दीपा गुरुंग सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत नेपाळमध्ये आहेत. वाचा : वाचा : व्हिडिओ कॉलवरून अंत्यदर्शन मंगळवारी सुबाथू (कसौली) भागातील स्मशानभूमीत बिलजंग गुरुंग यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी आपल्या मुलाला अखेरचं पाहताना आईने टाहो फोडला. वृद्ध पित्यानं आपल्या मुलाच्या पार्थिवाला अग्नी दिला. आठ महिन्यांनी गर्भवती असल्यानं बिलजंग यांच्या पत्नीला नेपाळवरून भारतात येता आलं नाही. त्यामुळे बिलजंग यांच्या पत्नीवर आपल्या पतीचे व्हिडिओ कॉलवरूनच अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली. बिलजंग गुरुंग यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना त्यांची पत्नी दीपा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवरच बिलजंग यांना निरोप दिला. शहीद बिलजंग गुरुंग यांनी दोन महिन्यांपूर्वी सुट्टी घेऊन नेपाळला जाऊन आपल्या पत्नीची आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली होती. आपल्या पत्नीशी हीच त्यांची अखेरची भेट ठरली. संरक्षणाचा वारसा सुट्टीनंतर बिलजंग भारत - चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात होते. बिलजंग यांचे पिता आपल्या मुलाच्याच युनिटमधून (गोरखा रेजिमेंट) सेवानिवृत्त होत डीएसआय अंतर्गत भारताच्या सुरक्षेत तैनात आहेत. तर त्यांचे भाऊदेखील गोरखा रेजिमेंमध्ये देशाच्या संरक्षणासाठी जम्मूच्या सीमेवर तैनात आहेत. शहीद बिलजंग यांचे भाऊ तुलसी गुरुंग यांना आपल्या भावाच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. बिलजंग शाळेत असल्यापासूनच शूर होता, असंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही जवानाच्या हौतात्म्यावर शोक व्यक्त केला आहे. ही दु:ख सहन करण्यास कुटुंबाला शक्ती मिळो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3n1ME5D
0 Comments