Ticker

6/recent/ticker-posts

भाजपला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी शिवसेना लागली तयारीला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आगामी मुंबई महापालिकेतही भाजपला चांगलाच धोबीपछाड देण्याचे ठरवले असून, त्यादृष्टीने आतापासूनच पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वॉर्डमधील प्रलंबित कामांना कशी गती देता येईल, नगरसेवकांना सोयीसुविधांसाठी अधिकाधिक निधी कसा देता येईल, राज्य सरकारच्या प्रशासनाकडून मुंबई महापालिकेत रेंगाळणारे प्रकल्प कसे मार्गी लागता येईल, यासाठीचे पद्धतशीर नियोजन करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. वाचा: भाजपला दूर लोटत शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महापालिका ही महत्त्वाची निवडणूक असल्याने त्याकडे पक्षाने सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'वर्षा' तसेच, 'सह्याद्री'वर मुंबईतील नगरसेवकांच्या, विभागप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन करायला सुरुवात केली आहे. नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी अशी सर्व मंडळी या बैठकांना उपस्थित असतात. नगरसेवकांच्या अडचणी आणि त्यावर महापालिका अधिकाऱ्यांकडून करायची कार्यवाही याचा आढावा तिथल्या तिथे मुख्यमंत्री घेत आहेत. याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने विभागातील मुंबई महापालिकेशी संबंधित कामांचे महत्त्वही या बैठकांमधून समजून घेतले जात आहे. कधी नव्हे; ते शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने मुंबई महापालिकेला मुख्यमंत्री तसेच नगरविकास विभागाकडून आवश्यक ती मदत देण्याचे काम विनाअडथळा होत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील या बैठकांना आवर्जून उपस्थित असतात. मुंबईतील रस्ते, उड्डापणूल, वाहतूककोंडीची ठिकाणे याबाबत नावीन्यपूर्ण गोष्टी कशा करता येऊ शकतात याच्या सूचना प्रामुख्याने आदित्य या बैठकांमध्ये मांडत आहेत. आगामी वर्षभरात मुंबईकरांसाठी नवी उद्याने, रुग्णालये कशी आणता येतील यादृष्टीनेदेखील या बैठकांमध्ये नियोजन केले जात आहे. अधिकारी, खासदारांची उपस्थिती अनेक प्रभागांमध्ये 'एसआरए'च्या योजना सुरू असून, बऱ्याचदा राज्य सरकारच्या परवानग्या, केंद्रातील रेल्वे प्रशासनाच्या परवानग्यांअभावी या योजना रखडल्या आहेत. त्यामुळे या योजनांना गती देण्यासाठी संबंधित राज्यातील अधिकारी, तसेच खासदार यांनाही या बैठकांना बोलावले जात आहे. नगसेवकांना अधिकाधिक निधी कसा मिळेल, त्यांच्या वॉर्डामधील योजना कशा लवकरच मार्गी लागल्या जातील यादृष्टीनेही आदेश दिले जात आहेत. वाचा: वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VUvQ4H

Post a Comment

0 Comments