
मुंबई : जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत आहे. सोन्याचा भाव सध्या सावरला असला तरी त्यावर नफेखोरांचे सावट आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता सोन्याचा भाव ५०३६३ रुपये झाला असून त्यात ३१५ रुपयांची वाढ झाली आहे. आज सकाळी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४९९५० रुपयांपर्यंत खाली घसरला होता. चांदीने सुद्धा ६०२५२ रुपयांचा स्तर गाठला. मात्र आता दोन्ही धातूंच्या किमती सावरल्या आहेत. सोने सध्या ५०३६३ रुपयांवर आहे. तर एक किलोला ६११७३ रूपये झाला आहे. त्यात ७५४ रुपयांची वाढ झाली आहे. goodreturns या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०४५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३३४० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२४३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८००० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२३६० रुपये आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्याने स्पॉट गोल्डचे दर १.८७ टक्क्यांनी घसरले व ते १८७७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागील आठवड्यात कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याचे दर आणखी खाली आले. महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या स्थितीत सोने हा मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी आणि कोषाध्यक्ष सचिव स्टीव्हन मुनचिन हे दोन्ही बाजूंतील दरी सांधण्याचा प्रयत्न करत असल्याने सोन्याच्या किंमती खाली घसरल्या. त्यामुळे गुंतवमूकदारांना आणखी प्रोत्साहनपर मदतीची अपेक्षा होती. चीनच्या मजबूत औद्योगिक वृद्धीमुळे सोन्याच्या दरातील वाढीवर मर्यादा आल्या. सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या वाढीव औद्योगिक कामकाजामुळे गुंतवणूकदारांच्या जोखीमीच भूक वाढली व परिणामी परदेशी मागणीतही सुधारणा दिसून आली. पुढील निवडणुका होईपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी अतिरिक्त मदतीच्या विधेयकाबद्दल चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवली. यामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jJxsZ9
0 Comments