Ticker

6/recent/ticker-posts

Coronavirus : देशातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ५० लाखांच्या घरात!

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोना संक्रमितांचा एकूण आकडा ६० लाखांच्या पुढे गेलाय. रविवारी एका दिवसात ८२ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत १०३९ करोनारुग्णांचा मृत्य झाल्याची नोंद करण्यात आलीय. मात्र, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एकूण ६० लाख करोना रुग्णांपैंकी करोना संक्रमणमुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहचलाय. ही एक दिलासादायक गोष्टच म्हणावी लागेल. गेल्या ११ दिवसांत १० लाखांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केलीय. देशात आत्तापर्यंत ६० लाख ७४ हजार ७०३ रुग्ण आढळलेत. यातील तब्बल ५० लाख १६ हजार ५२१ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. यातील ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. मात्र एव्हाना ९५ लाख ५४२ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. वाचा : वाचा : आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात दररोज सरासरी ९० हजार रुग्ण आजारातून बरे होत आहेत. देशात आत्तापर्यंत संक्रमणमुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा हा अॅक्टिव्ह केसेसच्या तुलनेत पाच पटीनं अधिक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी २७ सप्टेंबर २०२० रोजी तब्बल ७ लाख ०९ हजार ३९४ नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. यासोबतच आत्तापर्यंत देशात ७ कोटी १९ लाख ६७ हजार २३० नमुन्यांची करोना चाचणी पार पडलीय. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mXQ4qE

Post a Comment

0 Comments