
मुंबई: गानसम्राज्ञी यांच्या मधुर आवाजातील 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या हिचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. खुद्द लतादीदींनीही तिचं कौतुक केलं होतं. तसंच तिला मोलाचा सल्लाही दिला होता.रानूची सध्याची स्थिती पाहाता दीदींचं म्हणणं खरं झाल्याचं दिसून येत आहे. रानूचं स्टारडम हे काही दिवसांतच संपलं. पुन्हा तिच्यावर स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी लतादीदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रानू मंडलबाबत प्रतिक्रिया दिली होती. 'माझं नाव आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण मला वाटतं की कुणाचं अनुकरण करून मिळालेले यश फार काळ टिकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी गाऊन सध्याचे गायक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. पण ते कायम राहत नाही,' असं दीदी म्हणाल्या होत्या. वाचा: तसंच मनोरंजन वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांबाबतही लतादीदींनी चिंता व्यक्त केली होती. अनेक मुलं मी गायलेली गाणी खूपच चांगल्या पद्धतीनं निभावतात. पण त्यातील किती जण कायम स्मरणात राहतात. मी केवळ सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल यांनाच ओळखते,' असं त्या म्हणाल्या सगळ्या गायकांची सदाबहार गीते गायला हवीत; पण काही काळानंतर स्वतःचीही गाणी गा. 'ओरिजिनल' राहा, असा सल्लाही त्यांनी त्या मुलाखतीदरम्यान दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30g7fK2
0 Comments