Ticker

6/recent/ticker-posts

२ महिन्यांच्या बाळाला रुळांवर ठेवून महिला मालगाडीच्या दिशेने धावत सुटली, तेव्हढ्यात...

आग्रा: उत्तर प्रदेशातील रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिला आणि तिच्या दोन महिन्यांच्या बाळाचा जीव वाचला. रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेला रेल्वे पोलिसांनी पाहिले. त्यांनी वेळ न दवडता मोठे धाडस दाखवून महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे स्थानकात ही घटना घडली. प्रसंगावधान राखून दोघांना वाचवणाऱ्या दोन्ही रेल्वे पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, फिरोजाबाद रेल्वे स्थानकाजवळ रविवारी एका महिलेला रेल्वे रुळांवर धावताना पाहिले. तिच्याजवळ दोन ते तीन महिन्यांचे बाळ होते. मालगाडी येत असताना महिलेने तिच्याजवळील बाळ रुळांवर ठेवले आणि ती मालगाडीच्या दिशेने धावत सुटली. त्यामुळे खळबळ उडाली. या महिलेला रेल्वे पोलिसांनी पाहिले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता तिला वाचवण्यासाठी धावले. महिलेला धावत्या मालगाडीचा धक्का लागला. त्यावेळी दोन्ही जवानांनी जीव धोक्यात टाकून तिला बाहेर ओढले. या घटनेत महिला जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बाळ सुरक्षित आहे. महिलेच्या पतीला या घटनेची माहिती दिली आणि त्याला बोलावून घेतले. महिलेच्या पतीने सांगितले की, ती रागावून घरातून बाहेर निघाली होती. महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवणाऱ्या रेल्वेच्या दोन्ही पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून, रेल्वेतर्फे त्यांना गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोहम्मद मुश्ताक यांनी दिली. आणखी बातम्या वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iaH9yc

Post a Comment

0 Comments