
नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांच्या मनावर तो अजूनही राज्य करतोय. फक्त चाहतेच नाही तर भारतीय संघातील खेळाडू सुद्धा त्याला मीस करत असतात. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि टी-२० मालिकेत त्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनीचे चाहते मैदानात एक पोस्टरवर त्याला मीस करत असल्याचे सांगत आहेत. वाचा- या व्हिडिओत सिडनी मैदानावरील चाहत्यांच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. त्यात मीस यू असे लिहले होते. धोनी निवृत्त झाल्यानंतर याआधी देखील अनेकदा अशा पद्धतीचे पोस्टर मैदानार दिसले. पण हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, या पोस्टरवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये विराटने इशारा करत म्हटले आहे की, तो देखील धोनीला खुप मीस करत आहे. विराटने मी टू असा इशारा केल्याचे व्हिडिओत दिसतेय. वाचा- धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा विराटने सांगितले होती की, धोनीच माझा कर्णधार असेल. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी तो जुलै २०१९ मध्ये वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर विराटने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. अर्थात धोनीला या वर्षी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई प्रथमच प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39R5ZTx
0 Comments