Ticker

6/recent/ticker-posts

अवॉर्डवापसी करणारे देशभक्त नाहीत, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ : आणि मध्य प्रदेशचे कृषीमंत्री यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात ''चा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. मध्य प्रदेशच्या सत्ताधारी भाजपचे नेते आणि कृषी मंत्री कमल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अवॉर्डवापसीची तयारी दर्शवणाऱ्या खेळाडूंना चक्क 'देशद्रोही' ठरवण्याचा प्रयत्न केलाय. 'या अगोदरही अवॉर्ड वापसी झाली होती. यांना पुरस्कार कसे मिळालेत. जे लोक भारत मातेबद्दल वाईट शब्द उच्चारत होते किंवा देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत होते त्याना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं' असं म्हणत कमल पटेल यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. 'हे तथाकथित पुरस्कार विजेते आणि बुद्धिजीवी देशभक्त नाहीत' अशी पुश्तीही त्यांनी जोडलीय. वाचा : वाचा : सोमवारी शेतकऱ्यांना पाठिंबा देतानाच पंजाब - हरयाणाशी संबंधीत जवळपास ३० खेळाडूंनी 'अवॉर्ड वापसी' करण्यासाठी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु, दिल्ली पोलिसांकडून मात्र त्यांना रस्त्यातच अडवण्यात आलं. राष्ट्रपतींकडून मिळालेले विविध पुरस्कार परत करण्याची घोषणा या ३० खेळाडूंनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली होती. यामध्ये कुस्तीपटू यांचाही समावेश होता. रविवारी बॉक्स यानंदेखील कृषी कायदे मागे न घेतल्यास राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. उल्लेखनीय म्हणजे, कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशातील वेगवेगळ्या ट्रेड युनियन्सनं मंगळवारी भारत बंदची हाक दिलीय. आज शेतकरी आंदोलनाचा बारावा दिवस आहे. पाचव्यांदा सत्ताधाऱ्यांसोबत चर्चा फोल ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिलीय. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी प्रतिनिधिमंडळाच्या आत्तापर्यंत झालेल्या पाचही चर्चेत तोडगा निघू शकलेला नाहीत. वाचा : वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33T3nk8

Post a Comment

0 Comments