
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० डॉलरच्या नजीक पोहोचल्याने मागील सहा दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. यामुळे देशातील काही शहरात पेट्रोल ९० वर गेले. मात्र केंद्र सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका होऊ लागल्याने कंपन्यांनी दरवाढीला ब्रेक दिला. आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलची किमत जैसे थे आहे. गेल्या आठवड्यातील सलग सहा दिवस झालेल्या दरवाढीने मुंबईत पेट्रोल ९० च्या पुढे गेले होते. मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलाची दरवाढी तूर्त थांबली आहे. तेलाचा भाव प्रती बॅरल ०.१७ डॉलरने कमी होऊन तो ४५.५९ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.४६ डॉलरने कमी झाला आणि तो प्रती बॅरल ४८.७९ डॉलर झाला. ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज ५० लाख पिंप तेलाचे उत्पादन वाढवले जाणार आहे. यामुळे जागतिक बाजारात खनिज तेलावरील दबाव वाढला असल्याचे जाणकारांनी सांगितले. मागील आठवड्यात कोरोना लसीवरील संभाव्य लसीबाबत बेट्स वाढल्यामुळे, अमेरिकी क्रूड साठ्यात घसरण झाल्यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.६ टक्क्यांनी वाढले. मागील आठवड्यात, ओपेक आणि रशियाने जानेवारीपासून दररोज ५००,००० बॅरल्सचे उत्पन्न घेण्याचा करार केला. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ झाली. ओपेक आणि रशिया हा ग्रुप ओपेक+ म्हणून ओळखला जात असून, या समूहाने सध्याच्या ७.७ दशलक्ष बॅरल प्रतिदिन या पातळीवरून ७.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत उत्पादन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी क्रूडसाठाही -०.७ दशलक्ष झाला. तो -१.७ दशलक्ष एवढा होता. मागील पातळी -०.८ दशलक्ष एवढी होती. स्वामी यांची टीका दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतीवरून सरकारवर निशाणा साधलाय. स्वामी यांनी सरकारला अडचणीत आणणारं एक ट्विट केलंय.'पेट्रोलच्या किंमती ९० रुपये प्रती लिटर पोहचणं भारत सरकारकडून देशवासियांचं आश्चर्यकारक शोषण आहे. रिफायनरीमध्ये पेट्रोलच्या किंमती ३० रुपये प्रती लीटर आहेत. यानंतर सर्व पद्धतीचे कर आणि पेट्रोल पंप कमिशन मिळून यात ६० रुपयांची वाढ होते. माझ्या मते पेट्रोल जास्तीत जास्त ४० रुपये प्रती लिटर किंमतीनं विक्री व्हायला हवी' असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36Ynj75
0 Comments