
पुलवामा: जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षादलांच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. परिसरात शोध मोहीम सुरूच आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी पहाटे पुलवाम्यातील टिकन परिसरात आणि सुरक्षादलांच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. सीआरपीएफच्या १८२ व्या बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिस हे संयुक्त अभियान राबवत आहेत. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज आहे. सुरक्षादलांनी हा परिसर मोकळा केला आहे. सुरक्षादलांनी पुलवाम्यातील टिकन गावात मिळालेल्या माहितीच्या आधारे ही शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षादलांच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. क्लिक करा आणि वाचा बातमी- गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या नगरोटा चकमकीपासूनच सुरक्षादलांनी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा शोधण्याची मोहीम तीव्र केली होती. २१ नोव्हेंबरला सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पुलवामा येथे अटक केली होती. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lZDTHO
0 Comments