Ticker

6/recent/ticker-posts

Bharat Bandh विरोधात पुन्हा कंगना रणौतने केलं ट्वीट, म्हणाली-

मुंबई- वादग्रस्त शेतीविषयक कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर ट्वीट करुन चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री हिने आता शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या विरोधात ट्वीट केलं आहे. कंगनाने हे ट्वीट कवितेच्या स्वरुपाने केलं असून अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात सद्गुरू कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला विरोध करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'चला भारत बंद करू या, तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे संकटांची काही कमतरता नाही, पण तरीही आपण त्यात अजून भर टाकू.. दररोज कोणाना कोणाच्या आशा मरत असतात. आता देशप्रेमींना सांगा की त्यांच्या वाटणीचा देशाचा तुकडा तुम्हीही मागून घ्या. रस्त्यावर उतरा आणि तुम्हीही आंदोलनं करा. आज हा विषयच संपवून टाकू..' काही दिवसांपूर्वी मी कंगनाने शेतकरी आंदोलनाच्या निषेधार्थ बरेच ट्वीट केले होते. यातील एका ट्वीटमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेबद्दल तिने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर गोष्टी बोलल्या. यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. पंजाबी आणि बॉलिवूड स्टार दिलजीत दोसांजने कंगनाच्या प्रत्येक ट्वीटला तिच्याच भाषेत प्रत्यूत्तर दिलं होतं. यानंतर कंगनाने ती शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं म्हटलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JZ34xd

Post a Comment

0 Comments