Ticker

6/recent/ticker-posts

Video: लग्नाचे अमिष दाखवून १० वर्ष शोषण; पाक कर्णधारावर महिलेचा आरोप

नवी दिल्ली: संघाचा कर्णधार ( ) वर एका महिलेने धक्कादायक आरोप केले आहेत. संबंधित महिलेने बाबरवर लग्नाचे अमिष दाखवून १० वर्ष शारिरिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. वाचा- पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. बाबरवर आरोप करणाऱ्या महिलने म्हटेल आहे की, बाबरच्या कठीण परिस्थितीत मी त्याला साथ दिली होती आणि आर्थिक मदत देखील केली होती. आम्ही दोघे एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखतो. बाबरने २०१० साली लग्नाचे आश्वासन दिले होते. आम्ही घरच्यासोबत लग्नाबद्दल बोललो. पण त्यांनी नकार दिल्यावर तो मला घरातून घेऊन गेला. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. वाचा- २०१२ साली बाबरने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि त्यानंतर त्याची निवड राष्ट्रीय संघात झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर बाबरने मन बदलले, असा आरोप महिलने केले आहे. वाचा- यासंदर्भात पोलिसांकडे गेल्याने बाबरने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शारिरीक हल्ला केल्याचा महिलेने म्हटले आहे. बाबरने आपल्यासाठी अनेकवेळा खर्च केल्याचा दावा महिलेने केलाय. पाकिस्तान संघाच्या कर्णधारावर आरोप झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आता कर्णधारावर इतके गंभीर आरोप झाल्यानंतर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी PCBने बाबरकडे कर्णधारपद सोपवले होते. पाकचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये आहे. या दौऱ्या आधी संघातील ६ खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mkyOea

Post a Comment

0 Comments