
हैदराबाद: हैदराबाद पालिका निवडणुकीसाठी () १ डिसेंबर या दिवशी मतदान होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्ष () आणि एआयएमआयएमदरम्यान () वार-पलटवार सुरूच आहे. भाजपच्या दिग्गजांनी येथे हजेरी लावल्याने हैदराबाद पालिकेची ही निवडणूक पालिकेची न राहता जणू काय ती पंतप्रधानपदाची निवडणूक झाली आहे, अशा शब्दात एआयएमआयएचे प्रमुख (Asaduddin Owaisi) यांनी टोला हाणला आहे. ही निवडणूक हैदराबाद निवडणुकीसारखी वाटत नाही, असे वाटते की आम्ही पंतप्रधान मोदींच्या जागी नव्या पंतप्रधानांची निवड करत आहोत, असे ओवेसी म्हणाले. मी करवनमध्ये एक सभेला संबोधित करत होते. तेथे मी याबाबत विचारले. त्यावर एक मुलगा म्हणाला की या निवडणुकीला तर पंतप्रधानांची निवडणूक न म्हणता यांची निवडणूक म्हटली पाहिजे. तो योग्यच बोलत होता. आता केवळ येथे ट्रम्प यांनाच बोलावण्याचे बाकी आहे, असे म्हणत ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार टोला हाणला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हैदराबाद दौऱ्यानंतर ओवेसी यांनी पलटवार केला आहे. जी व्यक्ती हैदराबाद शहराचे नाव बदलू इच्छिते त्या व्यक्तीच्या पिढ्या बरवाद होतील मात्र या शहराचे नाव बदलणार नाही, असे ओवेसी म्हणाले. ओवेसी म्हणाले, 'हम अली के नाम लेवा है हम तुम्हारा नाम तब्दील कर देंगे.' जे लोक शहराचे नाव बदलू इच्छितात त्यांना तुम्ही उत्तर द्या असे माझे तुम्हाला सांगणे असल्याचे ओवेसी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले की, 'भाजपने या निवडणुकीसाठी किती लोकांना बोलावले, आता फक्त डोनाल्ड ट्रम्प तेवढे याचचे बाकी आहेत. जरी ट्रम्प आले तरी काहीही होणार नाही. कारण त्यांचाही हात हातात घेऊन 'अब की बार ट्रम्प सरकार' असे मोदी म्हणाले होते. मात्र तेही वाचले नाहीत आणि खड्ड्यात कोसळले. या लोकांना कितीही जिना जिना करूद्या. आम्ही जिनांच्या प्रेमाला ठोकर मारली. जे रजाकार होते ते पाकिस्तानला गेले आणि जे प्रामाणिक होते एकनिष्ठ होते ते हैदराबादमध्येच राहिले, असे ओवेसी पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o9As35
0 Comments