
मॉस्को: जगभरात आता संसर्गाची दुसरी लाट आली असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. मात्र, आता सगळ्यांचे लक्ष लशींच्या किंमतीकडे लागले आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना आणि फायजर या कंपन्यांची लस पुढील एक-दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे रशियाची स्पुटनिक व्ही लसदेखील लस स्पर्धेत असणार आहे. मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा 'स्पुटनिक व्ही'ची किंमत कमी असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. स्पुटनिक व्हीने केलेल्या ट्विटमध्ये फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे. मॉडर्ना आणि फायजरच्या तुलनेत स्पुटनिक-व्हीची किंमत कमी असणार असल्याचे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: वाचा: रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीची किंमत पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. रशियाने पहिल्यांदाच करोनाला अटकाव करणारी लस म्हणून स्पुटनिकला मान्यता दिली होती. फायजरने आपल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर दोन दिवसानंतर रशियाने आपली लस ९२ टक्के प्रभावी असल्याची माहिती दिली. भारतातही रशियन लशीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्यावतीने ही चाचणी होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. 'स्पुटनिक व्ही' लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. वाचा: वाचा: फायजरकडून वापरासाठी परवानगीची मागणीअमेरिकी औषध उत्पादक कंपनी 'फायझर'ने अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडे कोव्हिड लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. पुढील महिन्यापासून लशीचे मर्यादित व्यावसायिक उत्पादन सुरू केले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. 'फायझर' आणि त्यांची सहयोगी जर्मन कंपनी 'बायोएनटेक' यांनी युरोपीय महासंघ आणि ब्रिटनमध्येही आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. आपली लस ९५ टक्के सुरक्षित असल्याचे फायझरने नुकतेच जाहीर केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nKTYTa
0 Comments