
अहमदनगर: काँग्रेसमध्ये ज्यांना मोठा सन्मान मिळत होता, त्यातील काही नेते ऐन निवडणुकीत भाजपमध्ये गेले. सध्या त्यांना तेथे कोणताही मान-सन्मान मिळत नाही. त्यांना पाचव्या किंवा सहाव्या रांगेत बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असल्यासारखी झाली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे () यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचा रोख कोणाकडे आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल विविध चर्चा सुरू असल्या तरी युवक काँग्रेसचे () काम मात्र वेगाने सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी सुरू करण्यात आली असून यासाठी संगमनेरमध्ये मोठा मेळावा झाला. यामध्ये सोडून गेलेल्या अनेक युवक कार्यकर्त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी तांबे यांनी जाहीर केल्या. वाचा: यावेळी बोलताना तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून ती राज्यघटनेशी बांधील विचारधारा आहे. काँग्रेसने अनेक संकटातून पुन्हा उभारी घेतली आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षातून मोठी संधी मिळत आहे. जन माणसांचा काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास असून प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला. त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे. त्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत. तरुणांनी सातत्याने लोकांची कामे करावीत. कामांचा सातत्याने पाठपुरावा करावा. लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतील. आगामी काळात तरुणांनी राजकारणात काँग्रेस पक्षातून मोठी संधी असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांनाच प्राधान्य दिले जाइल,’ असेही तांबे म्हणाले. वाचा: यावेळी करण ससाणे, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, अजय फटांगरे, मनोहर पोटे, प्रशांत ओगले उपस्थित होते. जिल्हा व एनएसयूआयच्या नवीन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. पक्षात परत आलेल्यांचे स्वागत करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kTj4NJ
0 Comments