
नवी दिल्ली: दंगल गर्ल आई होणार आहे. बबीताने ही गुड न्यूज सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना सांगितली. या फोटोत बबीता सोबत तिचा पती विवेक सुहाग देखील दिसत आहे. बबीताचे पती विवेकने फोटो शेअर करताना म्हटले आहे की, पत्नी सोबत हा खास क्षण शेअर करताना मला भाग्यवान वाटत आहे आणि आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होणार असून मी उत्साही आहे. वाचा- बबीतीने ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात पती विवेक सुहाग देखील दिसत आहे. बबीताने बेबीबंपचा फोटो शेअर केलाय. या शिवाय तिने वाढदिवसाचा फोटो शेअर आहे. या फोटोत बबीताची मोठी बहिण गीतासह कुटुंबातील अन्य लोक दिसत आहेत. वाचा- आंतरराष्ट्रीय स्तरावर बबीताने देशाचे नाव गाजवले आहे. तिने २०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले होते. तिचे पती महावीर फोगाट यांनी विवेकसह फक्त एक रुपयात विवाह निश्चित केला होता. २०१९ साली दोघांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने केला होता. बलाली गावात झालेल्या विवाह सोहळ्यात देश आणि विदेशातील आले होते. वाचा- बबीताचा पती झज्जर जिल्ह्यातील मातनहेल गावाचा असून तो सध्या दिल्लीतील नजफगड येथे राहतो. भारत केसरी किताब कुस्तीपटू विवेक सध्या भारतीय रेल्वेत काम करतोय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/373dV0T
0 Comments