Ticker

6/recent/ticker-posts

अभिनेत्रीच्या कारला कन्टेनरने दिली धडक, घातपातीचा संशय

तमिळनाडू- अलीकडेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या अभिनेत्री यांचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचं गंभीर नुकसान झालं असलं तरी अपघातात खुशबू सुंदर यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पण घडलेल्या घटनेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वतः खुशबू यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली. खुशबू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, आमची गाडी योग्य लेनमधून जात होती. पण अचानक गाडीला एका टँकरने धडक दिली. हा अपघात मेलामरवाथुरजवळ घडला आहे. खुशबू सुंदर या वेल यात्री कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कडलोर येथे जात होत्या. यासोबतच खुशबू यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. तसेच मुरुगन देवाच्या कृपेने त्या या अपघातातून बचावल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. या अपघाताचा सध्या पोलीस तपास करत आहेत. यासोबतच कितीही संकटं आली तरी त्या कडलोर दौऱ्याला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. खुशबू सुंदर पुढे म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांनी हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही कन्टेनरला नाही तर कन्टेनरने आमच्या गाडीला धडक दिली आहे. आमची गाडी योग्य दिशेने पुढे जात होती. तेव्हा हा कन्टेनर अचानक कुठून आला माहीत नाही आणि त्याने आमच्या गाडीला धडक दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत चालकाची चौकशी करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36JXSoC

Post a Comment

0 Comments