नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही दिवसातच वनडे मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरूवात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी गेम प्लॅन सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फक्त मैदानावरची नाही तर मानसिकपातळीवर देखील कसोटी लागते. सध्या ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेपटू विराट कोहलीचे कौतुक करत आहेत. प्रशिक्षक जस्टिन लँगर पासून ते माजी कर्णधार स्टीव वॉ आणि मार्क टेलर हे सर्व जण विराटचे कौतुक करत आहेत. या सर्वांनी विराटला जगातील सर्वात मजबूत फलंदाज म्हटले आहे. वाचा- हा तर गेम प्लॅन... एखाद्या खेळाडूचे कौतुक करणे हा गेम प्लॅनचा भाग असतो. विराट कोहील संपूर्ण कसोटी मालिका खेळणार नाही. विराट फक्त पहिली कसोटी खेळणार असल्याने अनेक जण निराश आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ही गोष्ट नेहमीच घडत असते की, ते प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या खेळाडूबद्दल अथवा कर्णधाराबद्दल बोलत राहतात. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मालिका सुरू होण्याआधी ही गोष्ट नेहमी करतात. वाचा- पहिला कौतुक करायेच आणि मग... ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मालिका सुरू होण्याआधी मोठ्या खेळाडूचे कौतुक करतात आणि त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. त्यानंतर संबंधित खेळाडूने एखाद्या सामन्यात धावा केल्या नाही तर हेच कौतुक करणारे त्या खेळाडूवर आक्रमकपणे टीका करू लागतात. हा ऑस्ट्रेलियाच्याय गेम प्लॅनचा भाग असतो. आपल्या वक्तव्याने खेळाडूवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि प्रत्येक वेळी ते यशस्वी होतात. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हा देखील प्रयत्न करतात की संघात फक्त एक किंवा दोनच खेळाडू आहेत जे लढा देतात. मार्क टेलर आणि लँगर म्हणाले... माजी कर्णधार मार्क टेलर म्हणाले होते की, एक मजबूत खेळाडू आहे आणि त्याला ही गोष्ट शोभते. मी आतापर्यंत जितके खेळाडू पाहिले आहेत त्यात विराट सर्वश्रेष्ठ आहे. स्लेजिंगवर चर्चा प्रत्येक मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आक्रमक क्रिकेट आणि स्लेजिंगवर बोलत असतात. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर ही गोष्ट त्यांनी केली नाही. तेव्हा दोन खेळाडूंना बंदीला सामोरे जावे लागले होते. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी आल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने स्वत:ची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38WVQEb

0 Comments