ऋषिकेश : भारताचे अजित डोवाल () यांनी विजयादशमीच्या निमित्तानं आणि पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिलाय. चीनसोबत वास्तविक नियंत्रण रेषा () तणावादरम्यान डोवाल यांनी संतांच्या एका सभेला संबोधित केलं. 'नवा भारत नव्या पद्धतीनं विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशी धरतीवरही लढू, जिथे धोका दिसेल तिथे आम्ही प्रहार करू' असं यांनी संतांच्या सभेत म्हटलंय. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, अजित डोवाल () हे ऋषिकेशच्या परमार्थ निकेतन आश्रमाला संबोधित करत होते. 'भारतानं कधीही कुणावर अगोदर आक्रमण केलेलं नाही, परंतु, नव्या रणनीतीप्रमाणे सुरक्षा धोके कमी करण्यासाठी कदाचित आपल्याला पहिली कारवाई करायला हवी होती' असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 'हे गरजेचं नाही की आम्ही तिथे लढू जिथे तुमची इच्छा आहे, भारत युद्धाला तिथे घेऊन जाईल जिथून धोक्याची सुरुवात होते' असं म्हणत डोवाल यांनी ही 'भारताची नवी विचारधारा' असल्याचं म्हटलंय. वाचा : वाचा : 'आम्ही कधीही आपल्या स्वार्थासाठी युद्ध केलेलं नाही. आम्ही युद्ध तर करणार. आपल्या जमिनीवरही आणि बाहेरही करू परंतु, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर परमार्थासाठी करू...' असं वक्तव्यही अजित डोवाल यांनी केलंय. डोवाल यांनी हा () आणि चीनला () दिलेला इशारा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डोवाल यांचं हे वक्तव्य सद्य स्थितीवर कोणत्याही देशाविरुद्ध नव्हतं तर ते ऐतिहासिक संदर्भात बोलत होते. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34vsdaC

0 Comments