मुंबईः करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर नेते यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलली असून भाजपच्याविरोधात महाविकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. साहजिकच यंदाच्या दसरा मेळाव्यात ज्याचा खरपूस समाचार घ्यायचा, असा भाजप हा एकमेव विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याची उत्सुकता असतानाच संजय राऊत यांनी टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही, असा खोचक टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत, दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलचं, असं म्हटलं आहे. करोना नसता तर आजच्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. मुख्यमंत्र्यांच संबोधन ऐकण्यासाठी शिवतीर्थावर तुफान आलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. २०१९चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याचवेळी म्हणालो होतो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार त्यामुळं आजचा दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनाचा पहिलाच दसरा मेळावा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ksm3NH

0 Comments