मुंबईः यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारं आहे, अशा शब्दात भाजप नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. तेजस ठाकरे यांनी आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असलेल्या माशाची चौथी प्रजाती शोधून काढली आहे. या माशाचे नावही हिरण्यकेशी ठेवण्यात आलं आहे. तेजस ठाकरे यांच्या या नव्या शोधाचे चक्क भाजप नेते आशिष शेलार यांनीही कौतुक केलं आहे. सामना वृत्तपत्रातील बातमी शेअर करत शेलार यांनी ठाकरेंसाठी ट्विट केलं आहे. 'जीवसृष्टीला निसर्गानं अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी हिरण्यकेशी प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे,' असं ट्विट शेलारांनी केलं आहे. वाइल्ड लाइफ हा तेजस यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील शेवटचे नाव हे ठाकरे या आडनावावरून देण्यात आले आहे. खेकड्यांच्या संशोधनानंतर तेजस ठाकरेंनी पालींच्या विविध प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lVPEiW

0 Comments