Ticker

6/recent/ticker-posts

IPL मध्ये आज डबल हेडर; RR vs RCB दोन्ही संघांना हवाय विजय

दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज डबल डेहरचा दिवस आहे. अर्थात दोन लढती यातील पहिली लढत विरुद्ध ( Vs ) यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार असून दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतली. राजस्थान आणि बेंगळुरू यांनी त्यांच्या गेल्या सामन्यात पराभव स्विकारला आहे. बेंगळुपूने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तर राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला होता. गुणतक्त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूचा संघ ८ पैकी ५ सामन्यात विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थाने ८ पैकी ३ मध्ये विजय मिळवले आहे आणि ते सातव्या क्रमांकावर आहेत. वाचा- बेंगळुरूने गेल्या सामन्यात एबी डिव्हिलियर्सला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले यावरून खुप टीका होत आहे. अर्थात कर्णधार विराट कोहलीने पराभवानंतर या निर्णयाचे समर्थन केले होते. या सामन्यात एबीच्या आधी वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना पाठवले जाण्याची शक्यता नाही. बेंगळुरूची फलंदाजी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघ गेल्या काही सामन्यात मोठी धावसंख्या उभी करत आहे. ख्रिस मॉरिसने देखील त्याची उपयोगिता सिद्ध केली आहे. त्याने ८ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या होत्या. पण पंजाबच्या लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी धमाकेदार सुरूवात केली बेंगळुरूला संधी मिळाली नाही. फलंदाजी सोबत गोलंदाजी मध्ये देखील बेंगळुरूला काळजी करण्याचे कारण नाही. मॉरिसने चांगली गोलंदाजी केली आहे. याच बरोबर युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि उसुरू उडाना हे राजस्थानच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. वाचा- या उलट राजस्थान संघाची अवस्था आहे. त्यांना अद्याप फलंदाजीत संतुलन करता आले नाही. गेल्या सामन्यात विजय मिळाला असता पण जिंकणाऱ्या सामन्यात चूका केल्या आणि सामना गमवला. बेन स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा निर्णय राजस्थानसाठी अद्याप उपयोगी ठरला नाही. त्याने दिल्ली विरुद्ध ४१ धावा केल्या पण संघाला विजय मिळून देता आला नाही. त्यामुळे या सामन्यात राजस्थानच्या सलामीच्या जोडीत काही बदल पाहायला मिळू शकतो. त्याच बरोबर जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागले रॉबिन उथप्पाला अद्याप लय सापडली नाही. गेल्या सामन्यात संघाला विजय मिळून देता आला असता पण तो धावबाद झाला. गोलंदाजीचा विचार केल्यास जोफ्रा आर्चर वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला खास प्रभाव टाकता आला नाही. संभाव्य संघ राजस्थान- बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी बेंगळुरू- देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार) एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31fqC6q

Post a Comment

0 Comments