Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवारांचा उद्यापासून मराठवाडा दौरा; आज अजितदादांकडून पुरस्थितीची पाहणी

मुंबईः आठ दिवस कोसळलेल्या परतीच्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भुईमूग, सोयाबीन आणि भाताची पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आर्थिक कणा मोडला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांना कोंब आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे मराठवाड्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबादमधील भागांना भेट देणार असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजपासून बारामतीतील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक येथील विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व जिल्ह्यातील सद्यस्थितीता आढावा घेतला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. वाचा: ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठे नुकसान झालं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37gaQvV

Post a Comment

0 Comments