: झारखंडची राजधानी रांचे येथे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेविरुद्ध जोरदार विरोध प्रदर्शन केलं. रांचीतून अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांना मुक्त करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. फादर स्टॅन स्वामी अटकेत एनआयएनं डिसेंबर २०१७ मध्ये इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणात ८२ वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ता फादर स्टॅन स्वामी यांना रांचीतल्या घरातून अटक केली आहे. पुणे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा फादर स्वामींची चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित भाकपा (माओवादी) शी संबंधित असल्याच्या संशयावरून गुरूवारी संध्याकाळी त्यांच्या घरी चौकशी करून अटक करण्यात आली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील ही सोळावी अटक आहे. या हिंसाचार प्रकरणातील सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गॅडलिंग, अरूण फरेरा, वर्णन गोन्झाल्विस, हनी बाबू, शोमा सेन, महेश राऊत, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या स्वामी संपर्कात होते, असा एनआयएचा आरोप आहे. वाचा : वाचा : 'अटक हा कटाचा भाग' आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ८४ वर्षीय वयोवृद्ध स्टेन स्वामी यांना एका मोठ्या कटाद्वारे अटक करण्यात आलीय. त्यांची तत्काळ सुटका केली जावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. मानवाधिकार कार्यकर्ते अशी ओळख असलेले स्टॅन स्वामी यांना मुंबईच्या एका विशेष एनआयए न्यायालयानं २३ ऑक्टोबरपर्यंत शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36RSa5Q

0 Comments