
मनिला: कोंबड्यांची सुरू असलेली झुंज थांबवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कोंबड्याच्या झुंजीवर पोलिसांनी छापा मारला. मात्र, झुंजीसाठी असलेल्या एका कोंबड्याने पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या पायाची धमनी कापली गेली. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. फिलीपाइन्समधील सान जोसे शहरात ही घटना झाली. प्रांताचे पोलीस प्रमुख कर्नल अर्नेल अपुड यांनी सांगितले की, नॉदर्न समर भागात ही घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी लेफ्टिनंट ख्रिस्टिचन बोलॉक यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कोंबड्यांच्या झुंजीवर छापा मारल्यानंतर पोलिसांकडून उपस्थितांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कोंबड्याच्या पायावर असलेला धारदार ब्लेड पोलीस अधिकारी लेफ्टिनंट ख्रिस्टिचन बोलॉक यांच्या डाव्या पायाच्या धमनीत अडकला. यामुळे त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला. मात्र, अधिक रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. फिलिपाइन्समध्ये कोंबड्यांच्या झुंजीला 'तुपडा' म्हणतात. हा खेळ स्थानिक पातळीवर लोकप्रिय आहे. या झुंजीवर लोक सट्टादेखील खेळतात. वाचा: कोंबड्याच्या पायाला ब्लेड या लढाईत विरुद्ध बाजूच्या कोंबड्याला जखमी करून पराभूत करण्यासाठी कोंबड्याच्या पायाला धारदार ब्लेड लावतात. यामुळे बहुतांशी वेळा कोंबड्याच्या झुंजीत एक कोंबडा मृत्यूमुखी पडतोच. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने बंदी घातली असूनदेखील सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. वाचा: या घटनेवर पोलीस खात्याने शोक व्यक्त केला आहे. पोलीस प्रमुख कर्नल अर्नेल अपुड यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले. आपल्या २५ वर्षाच्या पोलीस सेवेत पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. सान जोसे शहरात झालेल्या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन कोंबड्यांना जप्त करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kOc59X
0 Comments