Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यात एमआयडीसीत तर मुंबईत मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचे नुकसान

पुणे: कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील शिवशक्ती ऑक्सिलेट प्रायव्हेट लिमिटेड (ए-८४-१) या कंपनीला रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. आजवरच्या सगळ्यात मोठ्या आगीमुळं परिसरात घबराट पसरली होती. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी तातडीनं आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सातच्या सुमारास आग आटोक्यात आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आजवरची ही सर्वात मोठी आग होती. पोलिसांनी कामगारांना वेळीच बाहेर काढल्यानं जीवितहानी झाली नाही. मुंबईत बाजारपेठेत आग मुंबईतील चेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या एका बाजारपेठेत आग लागून त्यात अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणली. दोन्ही आगींमुळं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jkc2Sr

Post a Comment

0 Comments