Ticker

6/recent/ticker-posts

'राज्यपालांची भूमिका गिनीज बुकात नोंद करण्यासारखी'

मुंबई: राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू झालेला वाद शमताना दिसत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात मत मांडल्यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी राज्यपालांना टोला हाणला आहे. ( on ) मंदिरे उघडण्याच्या मागणीवरून राज्यपाल कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारतानाच त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तुम्ही अचानक सेक्युलर झालात की काय?, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. या पत्रावरून जोरदार गदारोळ झाला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याच भाषेत राज्यपालांना सुनावलं होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी भाष्य केलं. 'राज्यपालांनी शब्द जपून वापरायला हवे होते,' असं शहा यांनी म्हटलं आहे. वाचा: शहा यांच्या या मताबद्दल प्रतिक्रिया विचारली असता वडेट्टीवारांनी राज्यपालांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यपालांची भूमिका ही गिनिज बुकात नोंद करण्यासारखी आहे. आतापर्यंत कुठल्याही राज्यपाल महोदयांनी इतकी वादग्रस्त भूमिका घेतली नव्हती. आताचे राज्यपाल कुठल्या चष्म्यातून राज्य सरकारकडे बघत आहेत हे सगळा महाराष्ट्र बघतोय. त्यांनी ज्या कुठल्या रंगाचा, विचाराचा आणि भावनेचा चष्मा लावला आहे, तो काढावा आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे. भविष्यात राज्यपाल तशी भूमिका घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाचा: वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/345YAfA

Post a Comment

0 Comments