Ticker

6/recent/ticker-posts

'त्या' भयानक प्रसंगानंतर २ महिलांनी धावत्या कारमधून मारडी उडी

अमृतसर: चालकाने विनयभंगाचा प्रयत्न केल्यानंतर दोन महिलांनी धावत्या कारमधून उडी मारली. यात महिला जखमी झाल्या आहेत. या कारमध्ये अन्य एक महिला होती. स्थानिकांनी कारचा पाठलाग करून या महिलेची सुटका केली. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाला अटक करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्याचे प्रभारी रॉबिन हंस यांनी सांगितले की, तीन महिलांना रणजीत अॅव्हेन्यू परिसरातील एका रेस्तराँमध्ये जायचे होते. त्यांनी कार बुक केली. त्या कारमध्ये बसल्या. वाटेत चालकाने त्यातील एका महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केला. तिने चालकाला विरोध केला. त्यानंतर चालकाने कारचा वेग वाढवला. त्यानंतर दोन महिलांनी भीतीने धावत्या कारमधून उडी मारली. घटना घडली त्यावेळी रस्त्याच्या बाजूला काही नागरिक होते. महिलांनी कारमधून उडी घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्या नागरिकांनी कारचा पाठलाग केला. कार अडवून कारमधील अन्य एका महिलेची सुटका केली. कारचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही वेळाने त्याला अटक केली, अशी माहितीही हंस यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dDxrnw

Post a Comment

0 Comments