Ticker

6/recent/ticker-posts

ट्रम्प यांची भारतावर पुन्हा टीका; म्हणाले भारत हा....

वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक उमेदवारांमध्ये सुरू असलेल्या अध्यक्षीय वादविवादात विद्यमान राष्ट्राध्यक्ष यांनी भारतावर टीका केली आहे. भारत हा विषारी हवा सोडणारा देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे. पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. त्यावेळीही ट्रम्प यांच्या धोरणावर टीका झाली होती. अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे. हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पॅरिस करारातून बाहेर पडण्याचे त्यांनी यावेळी समर्थन केले. पॅरिस करार हा एकतर्फी होता. या करारामुळे अमेरिकेचे नुकसान झाले असते त्यांनी म्हटले. वाचा: हवेच्या गुणवत्तेकडे अमेरिकेचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती. प्रदूषणाच्या नावावर वॉशिंग्टनमधील कट्टर डावे, माथेफिरू डेमोक्रेट्स सदस्यांमुळे असंख्य अमेरिकन कारखाने, उद्योग, चीन व इतर प्रदूषण पसरवणाऱ्या देशांमध्ये गेले आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांना रोजगारदेखील गमवावा लागला आहे. हवेची गुणवत्ता चांगली असली पाहिजे यात वाद नाही. मात्र, चीन, रशिया, भारत आपल्या देशात होणाऱ्या वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. वाचा: वाचा: एअर क्वालिटी इंडेक्स ४०० हून अधिक भारताची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असतानाच ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. दिल्ली-एनसीआर भागात प्रदूषण वाढू लागले आहे. दिल्लीतील अलिपूर भागात एअर क्वालिटी इंडेक्स ४०० हून अधिक झाला आहे. सकाळी सात वाजता दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर ३०० इतका नोंदवण्यात आला आहे. अलिपूर, शादीपूर, जहांगीरपुरी, विवेक विहार, वजीरपूर, बवाना आणि मुंडका या भागात प्रदूषणाचा स्तर गंभीर आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jtOxWo

Post a Comment

0 Comments