पणजी: एअर इंडियाच्या (Air India) दिल्ली-गोवा विमानात असल्याचा विमानातील प्रवाशाने दावा केला आणि एकच खळबळ उडाली. हे विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्या केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (a passenger claimed there was a on the plane arrested him) जिया उल हक असे या ३० वर्षीय प्रवाशाचे नाव आहे. तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलिस ठाण्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रवासी विमानातून उतरल्याबरोबर त्याला अटक करण्यात आली. आपण विशेष विभागाचे अधिकारी असल्याचा दावा करत विमानात दहशतवादी असल्याचे त्याने विमानातील प्रवाशांना सांगितले होते. या प्रवाशाने विमानात दहशतवादी असल्याचा दावा केल्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हे विमान गोव्यातील डाबोलिम विमानतळावर उतरल्यानंतर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या प्रवाशाला तपाणीसाठी एका शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. क्लिक करा आणि वाचा बातमी- पुढे स्थानिक दंडाधिकाऱ्याद्वारे आवश्यक ते आदेश प्राप्त केल्यानंतर त्याला पणजीजवळ असलेल्या मानसशास्त्र आणि मानवी वर्तन संस्थेत दाखल करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा बातमी-क्लिक करा आणि वाचा बातमी-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2FSeTDv

0 Comments