मुंबई- प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. यानंतर रियाने जवळपास एक महिना तुरुंगात घालवला. नुकताच तिला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिन मिळाला. रिया घरी परतल्यानंतर सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूडचा एक मोठा वर्गही रिया चक्रवर्तीच्या समर्थनात पुढे आला आहे. या यादीत आता अभिनेता यांचं नावही जोडलं गेलं आहे. एक दिवस आधी रियाने तिच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थावानीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवसआधी म्हणजे १३ जून रोजी डिंपलने रिया आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचा दावा केला. याविरोधात रियाने तक्रार दाखल करत डिंपलचे आरोप हे निराधार असल्याचं म्हटलं. तसंच असे खोटे विधान देऊन खटल्याची चौकशी चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही रिया म्हणाली. या वृत्तावर आता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्वीट करत म्हटलं की, 'तुला अजून ताकद मिळो रिया.. सत्यापेक्षा सामर्थ्यवान अजून काहीच नाही.' सीबीआयने रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपलची चौकशी केल्याची बातमीही एकदिवस आधीच आली होती. सीबीआयच्या चौकशीदरम्यान डिंपलने सुरुवातीला दिलेलं विधान फिरवलं आणि १३ जून रोजी तिने रिया आणि सुशांतला एकत्र पाहिलं नसल्याचं म्हटलं. तसंच दोघं एकत्र असल्याचं तिने कोणाकडून तरी ऐकलं होतं असंही ती पुढे म्हणाली. डिंपलने सुशांत आणि रियाविषयी माध्यमांना जे विधान दिलं होतं त्यावर रियाचे वकील सतीश मनेशेंडे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36ZWzUj

0 Comments