Ticker

6/recent/ticker-posts

फ्रान्समध्ये करोनाचा कहर सुरू; २४ तासांत ३३ हजार बाधित

पॅरिस: युरोपीयन देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटन, फ्रान्ससह इतर देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ३३ हजार ४१७ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर, ५२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत करोनाच्या आजारामुळे एकूण ३५ हजार ५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाबाधितांची संख्या एक लाख ९८ हजार झाली आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात फ्रान्स सरकार आणखी कठोर निर्णय घेणार असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन हे देशाला संबोधित करणार असून त्यामध्ये करोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती, नवीन निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. रविवारीदेखील फ्रान्समध्ये ५२ हजार बाधितांची नोंद करण्यात आली होती. वाचा: फ्रान्समध्ये संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे काही दिवसांपूर्वीच सरकारने देशात आरोग्य आणीबाणी जाहीर केली. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय काही शहरांमध्ये संचार बंदीही लागू करण्यात आली असल्याची घोषणा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी केली होती. आरोग्य आणीबाणी लागू केल्यामुळे सरकारला करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याच्यादृष्टीने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर मोठे निर्णय घेता येणार आहेत. फ्रान्सने याआधी मार्च महिन्यात आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी सरकारने कठोर निर्बंध लादले होते. यामध्ये लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे निर्बंध १० जुलै रोजी हटवण्यात आले होते. वाचा: कमी झाल्यानंतर फ्रान्समध्ये निर्बंध शिथील केले होते. खासगी पार्टी, कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत होते. यातूनच करोनाचा संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले. करोना अधिक फैलावू नये यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. पॅरिससह आठ शहरांमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. करोनाचा संसर्ग न रोखल्यास आरोग्य व्यवस्थेवर आणखी मोठा ताण येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाचा: जर्मनीतही करोना कहर जर्मनीत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये जर्मनीत ११ हजार ४०९ नवीन बाधिते आढळली आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ४९ हजार झाली आहे. त्याशिवाय, करोनामुळे प्राण गेलेल्यांची संख्या दहा हजारांहून अधिक झाली आहे. वाचा: दरम्यान, तर, दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना युरोपीय देशांची काळजी आणखी एका कारणामुळे वाढली आहे. युरोपात करोनाची दुसरी लाट आली असताना करोनाबाधितांमध्ये वृद्धांची संख्या मोठी असल्याचे समोर आले असल्याचे 'सीएनएन'ने म्हटले आहे. युरोपीयन सेंटर फॉर डिजीस प्रीव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने याबाबतचा इशारा जारी केला आहे. जवळपास १३ युरोपीयन देशांमध्ये ६५ वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये संसर्ग फैलावत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये मागील सहा आठवड्यात ६५ व त्यावरील अधिक वयांच्या बाधितांची संख्या तीनपटीने वाढली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2G42AUH

Post a Comment

0 Comments