
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे, मात्र जागतिक बाजाराशी इंधन दर संलग्न असून देखील त्याच्या फायदापासून भारतीय वंचीत आहेत. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेल दर जवळपास महिनाभरापासून स्थिर ठेवले आहेत. आज शनिवारी २९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.३८ टक्के घसरले आणि ३५.७९ डॉलर प्रती बॅरल इतका घसरला आहे. मागील पाच महिन्यांतील हा सर्वात कमी दर आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी सलग २९ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. करोना बळावल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.३८ टक्के घसरले आणि ३५.७९ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावले. ब्रेंट क्रूडच्या दरात ०.१९ टक्के घसरण झाली असून भाव ३७.४६ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील रुग्णसंख्या वाढल्याने तेलाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका आणि रशियात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या. युरोपियन देशांत विषाणूमुळे नवे निर्बंध लादले गेल्याने जागतिक आर्थिक सुधारणेची गती आणखी कमी होऊ शकते व त्यामुळे तेलाचे दरही आणखी घसरू शकतात. अमेरिकेच्या क्रूड साठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलची वृद्धी झाल्याचे अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने नोंदवले. मागील आठवड्यात अमेरिकेचे क्रूड उत्पादन मागील तीन महिन्यातील सर्वोच्च पातळीवर झाले. त्यामुळे तेलाच्या दरात पुन्हा घट दिसून आली. झेटा चक्रिवादळामुळे मेक्सिकोच्या आखातात तेल उत्पादन बंद होते. त्यामुळे मागील व्यापारी सत्रात तेलाचे दर काहीसे वाढले होते. तथापि, वाढीव तेल पुरवठा आणि जागतिक मागणीतील घट यामुळे या स्थितीचा लाभ तेल बाजाराला फारसा झाला नाही व दरात आणखी घसरण दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली होती. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले होते. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3e9ZNGi
0 Comments