
वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. अशावेळी मात्र, बंदुकांची विक्रीही जोरात सुरू आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना बंदूक खरेदीचा आलेख चढता आहे. वाढती बंदूक खरेदी पाहता वॉलमॉर्टने आपल्या रिटेल स्टोअरमधून बंदूका आणि गोळ्या विक्री करणे बंद केले आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी हिंसक संघर्ष, गृह कलह निर्माण होण्याचा धोका आहे. अमेरिकेत करोना महासाथीच्या आजारात बंदूकांची विक्री अधिक झाली आहे. लॉकडाउनच्या काळात अथवा वाढत्या बेरोजगारीमुळे लुटमार, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुका खरेदी केल्या होत्या. त्याशिवाय वर्णद्नेष आणि राजकीय तणावामुळेही बंदूकांची विक्री वाढली आहे. जवळपास ५० लाख लोकांनी पहिल्यांदा बंदूक खरेदी केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाचा: एका अंदाजानुसार, दर १०० नागरिकांमागे सरासरी १२० बंदूका खरेदी करण्याचे प्रमाण आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अंतर्गत कलहामुळे हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही अशीच शक्यता वर्तवली होती. आपला देश दुभंगला गेला असून मतदानाचा अंतिम निकाल जाहीर होण्यात काही दिवस, आठवडे लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण अमेरिकेत हिंसाचाराच्या घटना घडण्याची भीती झुकरबर्ग यांनी व्यक्त केली. वाचा: दरम्यान, याआधीदेखील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकाला आपल्या मनासारखे न लागल्यास मिलिशिया कारवाई करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. पेन्सिलवेनिया, मिशिगन, जॉर्जिया आणि विस्कोन्सिन आदी राज्ये निवडणुक निकालांच्या अनुषंगाने अधिक महत्त्वाची आहेत. या राज्यातच शस्त्रांनी सज्ज असलेल्या मिलिशियाच्या कारवाईचा अधिक धोका आहे. वाचा: मिलिशिया कोण आहेत? मिलिशिया हा एक गट असून पोलिसांप्रमाणे समांतर कारभार चालवतो. यातील नऊ गट अधिक सक्रिय आहेत. यामध्ये प्राउड बॉईज, पॅट्रिएट प्रेअर, ओथ किपर्स, लाइट फूट मिलिशिया, सिविलियन डिफेन्स फोर्स, अमेरिकन कंटीजेन्सी आणि बोगालू बॉइज सर्वाधिक सक्रिय आहेत. यातील काही गटांनी उघडपणे ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ट्रम्प यांनीदेखील या गटांची स्तुती केली आहे. वाचा: ट्रम्प विजयी न झाल्यास रस्त्यावर उतरणार शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. तर, अमेरिकेत मतदाना दरम्यान, हेराफेरी होणे ही दुर्मिळ बाब आहे. असले प्रकार घडत नाही आणि त्याचा परिणामही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प विजयी न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मिलिशिया गटांनी दिला आहे. अमेरिकेतील काही राज्यांतील कोर्टांमध्ये मतदान केंद्रावर बंदूका घेऊन जाण्याच्या परवानगीबाबत सुनावणी सुरू आहे. मिशिगनच्या एका न्यायाधीशाने याबाबत अनुकूलता दाखवली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HHRWUJ
0 Comments