Ticker

6/recent/ticker-posts

देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले...

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते यांना करोनाची लागण झाली आहे. यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना केली,' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर, 'फडणवीस यांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही,' असा टोलादेखील लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, फडणवीस लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्व नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहेत. संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसंच, 'बाहेर परिस्थिती किती गंभीर आहे, हे आज फडणवीसांना समजले असेल,' असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, 'मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला असून सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल,' असंही संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, 'करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता ५० जणांच्या उपस्थितीत सभागृहात होणार आहे. करोनाचे संकट नसतं तर शिवतीर्थ अपुरे पडलं असतं. मुख्यमंत्र्यांचा संबोधन ऐकण्यासाठी शिवतीर्थावर तुफान आलं असतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, आम्ही नियम पाळतो म्हणून मोजक्या लोकांच्याच उपस्थितत मेळावा घेतोय. पण, बिहारमध्ये ५० हजार लोकांचे मेळावे चालले आहेत त्याचं काय?.' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jsBmon

Post a Comment

0 Comments