 
करोना काळात परीक्षा घेऊ नये म्हणून देशभरात विरोध होत असतानाही, सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर आज, मंगळवार १ सप्टेंबर पासून परीक्षेला देशभरात सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक संपूर्ण सुरक्षेच्या खबरदारीसह परीक्षा केंद्रांच्या आत सोडण्यात येत आहे. जाणून घ्या परीक्षा विषयक ताज्या घडामोडी ... - नागपूर खंडपीठाने निर्देश दिले की पुरामुळे जे विद्यार्थ परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तसे कळवावे, अर्ज करावा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणी आज सकाळी अर्जंट सुनावणी घेतली. - पहिल्या शिफ्टमध्ये वापरण्यात येणारे संगणक दुसऱ्या शिफ्टमध्ये वापरले जाणार नाहीत - शिफ्ट सुरू होण्याआधी परीक्षा केंद्रात संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - विद्यार्थ्यांना मास्क पुरवले जात आहेत. - विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने परीक्षा केंद्राच्या आत सोडले जात आहे ते व्हिडिओत पाहा - मुंबई तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांसमोर प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. यावर आता मध्य व पश्चिम रेल्वेने तोडगा काढला असून या विद्यार्थ्यांना उनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी संयुक्त प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे. यामुळे मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला आणि विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YT1r8L
 

 
0 Comments