Ticker

6/recent/ticker-posts

भारताच्या आक्रमकतेने चीनचा थयथयाट; केली 'ही' अजब मागणी!

बीजिंग: लडाखमधील पॅन्गाँग सरोवराजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. त्यानंतर आता चीनचा थयथयाट सुरू झाला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने भारताकडे अजबच मागणी केली आहे. भारताने या भागातील सैन्य त्वरीत मागे घ्यावे असे चीनने म्हटले आहे. याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पॅन्गाँग सरोवराजवळ झालेल्या घुसखोरीचा भारताचा दावा फेटाळून लावला. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्याने म्हटले की, भारतीय सैन्याने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत सहमती झालेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. सोमवारी भारतीय सैन्याने जाणूनबुजून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडलू असल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सने केला आहे. भारताची ही कृती चीनला उकसवण्यासाठी होती असेही त्यांनी म्हटले. वाचा: वाचा: चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन यांनी सांगितले की, चीनच्या सैन्याने कायमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) नियमांचे पालन केले आहे. त्यांनी कधीच एलएसी ओलांडली नसल्याचाही हास्यास्पद दावा केला. भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा सुरू असून दोन्ही देश राजनयिक आणि लष्कराच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: भारतीय जवानांनी चीनच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडल्यामुळे चीनचा नाचक्की झाली आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनी सेनेच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी'च्या (PLA) जवानांनी शेवटच्या बैठकीत झालेला करारही तोडला आणि पूर्व लडाख भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. २९ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास चीनच्या सुमारे २०० सैनिकांनी एसयूव्हीच्या ताफ्यात आले. चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करतील अशी शक्यता भारतीय लष्कराच्या जवानांना आधीच होती. यामुळे त्या भागात जवानांना आधीच तैनात करण्यात आले होते. एसयूव्हीचा ताफा घेऊन आलेले चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांना तीव्र विरोध केला. या दरम्यान, काही मिनिटे धक्का-बुक्की झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे सैनिक तिथेच ठाण मांडून होते. भारतीय जवानांच्या विरोधानंतर चिनी सैनिकांनी माघार घेतली. यावेळी कोणत्याही भारतीय जवानाला दुखापत झाली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34P4cvt

Post a Comment

0 Comments