
लखनऊ : तब्बल २८ वर्षानंतर आज बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल येणार आहे. या या प्रकरणात , , , विनय कटीयार, साध्वी रितंभरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आर एम श्रीवास्तव यांच्यासहीत ३२ जण आरोपी आहेत. मागच्या सुनावणीत न्यायालयानं निर्णयाच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पण आज एकूण सहा जण कोर्टासमोर हजर होणार नसल्याचं समजतंय. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, रामचंद्र खत्री आणि सुधीर कक्कड हे सीबीआय न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. या पाचही आरोपींकडून त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावणार असल्याचं समजतंय. बाबरी प्रकरणात एकूण ४९ आरोपी आहेत. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : ९२ वर्षीय लालकृष्ण आडवाणी ९२ वर्षीय लालकृष्ण आडवाणी वयोवृद्ध असल्यानं चालण्या-फिरण्यास असमर्थ आहेत. त्यांची प्रकृतीही सध्या साथ देत नाही. अशावेळी ते न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांचे वकील न्यायालयासमोर प्रार्थनापत्र सादर करू शकतात. उमा भारती करोना संक्रमित सोमवारी उमा भारती करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे त्यादेखील आज न्यायालयासमोर उपस्थित राहू शकणार नाहीत इतर आरोपीही अनुपस्थित आडवाणी आणि उमा भारती यांच्याशिवाय मुरली मनोहर जोशी यांचंही वय अधिक आहे त्यामुळे तेदेखील न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. आणखी एक आरोपी रामचंद्र खत्री एका दुसऱ्या गुन्ह्यासाठी हरियाणाच्या सोनीपतच्या तुरुंगात बंद आहे त्यामुळे तेदेखील या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. याशिवाय कारसेवक सुधीर कक्कड यांनीदेखील उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलंय. यामुळे, न्यायालय आपला निर्णय पुढे ढकलणार की आजच या प्रकरणात आपला निर्णय सुनावणार याची अनेकांना उत्सुकता आहे. इतर बातम्या : वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2G2iW0h
0 Comments