
नवी दिल्ली: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी ( ) आज लखनऊचे विशेष न्यायालय निकाल देत आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासह एकूण ३२ आरोपी आहेत. याच आरोपींपैकी एक असलेले रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य () यांनी एक वक्तव्य केले आहे. आम्हीच बाबरी मशिदीचा घुमट तोडला आणि यासाठी आपल्याला फाशीची शिक्षा झाल्यास त्या शिक्षेसाठी आपण तयार आहोत, असे वेदांती यांनी म्हटले आहे. रामलल्लासाठी फाशीवर लटकण्यासही तयार- वेदांती अयोध्येत मंदिर होते, मंदिर आहे आणि मंदिर राहील याचा आम्हाला विश्वास आहे, असे वेदांती यांनी या प्रकरणी निकाल येण्यापूर्वी म्हटले आहे. आम्हीच बाबरी मशिद तोडण्याचे काम केले. आम्ही ते अवशेष तोडले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. जर बाबरीचे अवशेष तोडल्याच्या आरोपाखाली आम्हाला फाशी झाली किंवा जन्मठेप झाली, तरी देखील रामलल्लासाठी आमि तुरुंगात जाण्यासाठी आणि फाशीवर लटकण्यासाठी तयार आहोत, मात्र आम्ही रामलल्लाला सोडण्यास तयार नाही, असे वेदांती यांनी म्हटले आहे. बाबर तर कधी अयोध्येत आलाच नाही- वेदांती रामाचा जन्म अयोध्येत झाला, बाबर कधीच अयोध्येत आलेला नाही, असे सांगत मग तेथे बाबरी मशीद कशी काय, असा सवालही रामविलास वेदांती यांनी उपस्थित केला. हा प्रश्नच उपस्थित होत नाही. याचसाठी आम्ही सन २००५ मध्ये जेथे रामलल्ला विराजमान आहेत तीच रामजन्मभूमी आहे हे आम्ही सिद्ध केलेले आहे, असे वेदांती म्हणाले. क्लिक करा आणि पाहा- आरोपींना ३ वर्षे ते जन्मठेपेपर्यंत होऊ शकते शिक्षा तब्बल २८ वर्षांनंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल लागत आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह ३२ आरोपी आहेत. या आरोपींना आज लखनऊतील विशेष सीबीआय न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. जर न्यायालयाने आज शिक्षा सुनावली तर अनेकांना ३ वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ih5xhU
0 Comments