Ticker

6/recent/ticker-posts

भारताचा रिटेल किंग मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या ताब्यात

नवी दिल्ली: मुकेश अंबानींच्या नेृत्वाखालील इडस्ट्रज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने शनिवारी एक मोठी घोषणा केली. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी फ्यूचर ग्रुपचे रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग बिझनेस विकत घेतल्याचे सांगितले. वाचा- रिलायन्सने २४ हजार ७१३ कोटी रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. या घोषणेमुळे भारतातील रिटेल बिझनेसमध्ये रिलायन्स खऱ्या अर्थाने किंग झाला आहे. फ्यूचर ग्रुपच्या रिटेल बिझनेसमध्ये बिग बाजार, फूड बाजार, सेंट्रल, ब्रॅण्ड फॅक्ट्री आणि होम टाउनचा समावेश होते. हे सर्व आता रिलायन्स रिटेलच्या छता खाली येणार आहे. वाचा- दोन्ही कंपन्यांमधील या करारानंतर आता फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडच्या अंतर्गत येईल. ही कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडची मालकी असलेली उपकंपनी आहे. तर फ्यूचर ग्रुपच्या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग बिझनेसवर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडचा अधिकार असेल. वाचा- रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाइल लिमिटेड ही कंपनी फ्यूचर एटरप्रायझेस लिमिटेडमध्ये गुंतवणूक करेल. ते १ हजार २०० कोटींचे प्रेफरेंशियर इश्यू करतील आणि फ्यूचरमधील ६.०९ टक्के हिस्सा विकत घेतील. त्या शिवाय ४०० कोटी इक्विटीच्या रुपात गुंतवणूक करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक यांनी रिटेल बिझनेसमधील ३ कोटी किराना मालक आणि १२ कोटी शेतकऱ्यांशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फ्यूचर कंपनी ताब्यात आल्यामुळे रिलायन्सची बाजारपेठेतील स्थिती आणखी मजबूत झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YNARhh

Post a Comment

0 Comments