Ticker

6/recent/ticker-posts

करोना: तब्बल २० टक्के फ्रान्स 'रेड झोन'मध्ये; सरकारने घेतला हा निर्णय

पॅरीस: करोनाच्या संसर्गाचे थैमान सहन केल्यानंतर फ्रान्स पु्न्हा पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, फ्रान्समधील काही भागात अजूनही करोनाचे संसर्ग कायम आहे. जवळपास २० टक्के भाग हा रेड झोन असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तर, पुढील आठवड्याापासून शाळा, कार्यालये आणि 'टूर दी फ्रान्स'चे आयोजन करण्याचा निर्धारही सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. अशा स्थितीत पॅरीसमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी रेड झोनचा नकाशा दाखवत स्थानिक पातळीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्याचे आवाहन केले. करोनाचा संसर्ग आणखी नियंत्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. करोनाचा प्रसार होत असून त्याला रोखण्यासाठी आपल्याला आणखी प्रभावी हस्तक्षेप करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: फ्रान्समधील १०१ प्रशासकीय विभागातील २१ विभाग हे रेड झोनमध्ये आहेत. या विभागात करोनाचा संसर्ग फैलावत आहे. या विभागांमध्ये स्थानिक अधिकारी लोकांना एकत्र येण्यावर व इतर कार्यक्रमांवर निर्बंध लागू शकतात. पॅरीसमध्ये सर्वांनाच मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाचा: फ्रान्समध्ये करोनाच्या संसर्गामुळए ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन आणि इटलीनंतर युरोपमध्ये सर्वाधिक मृत्यू फ्रान्समध्ये झाले आहेत. करोनाच्या संसर्गासोबत राहण्याची तयारी करावी लागणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यापासून फ्रान्समधील सर्वच कार्यालये सुरू करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय नागरिकांनी पार्टीचेही आयोजन करू नये असेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय वयस्कर मंडळींनीही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. वाचा: दरम्यान, रशियाने स्पुटनिक व्ही या लशीची घोषणा केल्यानंतर आता दुसरी आणखी एक लस विकसित केली आहे. या लशीला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे वृत्त आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी सांगितले की, सप्टेंबर अखेरपर्यंत अथवा ऑक्टोबरपर्यंत लशीबाबतची सर्व तयारी पूर्ण करण्यात येणार आहे. उपपंतप्रधान गोलिकोना यांनी एका सरकारी बैठकीत राष्ट्रपती पुतीन यांना सांगितले की, सायबेरियातील वेक्टर वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये विकसित करण्यात आलेल्या लशीची चाचणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2G8C6RT

Post a Comment

0 Comments