मुंबई : अर्थव्यवस्था अनलॉकच्या दिशेने वाटच करत असून हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने भांडवली बाजारातील गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे दिवसागणिक शेअर बाजारात तेजी वाढत आहे. आज शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाली आहे. या सहा सत्रात सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीने २३० अंकांची कमाई केली आहे. या दरम्यान गुंतवणूकदारांनी किमान दोन लाख कोटींची कमाई केली आहे. एकीकडे करोनाचा प्रकोप सुरु असला तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र भारतीय बाजारांमध्ये जोरदार गुंतवणूक करत आहे. बेंचमार्क निर्देशांकांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदवली. निफ्टी ९.६५ अंकांनी वधारला आणि ११,५५९.२५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ३९.५५ अंकांनी वाढला आणि ३९११३.४७ अंकांवर स्थिरावला. गुरुवारच्या सत्रात इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एमअँडएम , एसबीआय आणि ग्रासीम हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर ओएनजीसी, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज , झी एंटरटेनमेंट आणि कोल इंडिया हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तेल व वायू, टेलिकॉम, युटिलिटीज आणि एफएमसीजी क्षेत्रात वाढ दिसून आली. मिडकॅप ०.०१ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप ०.३५ टक्क्यांनी वाढले. ग्लोबल फायनान्शिअल फर्म यूबीएसने विक्रीवरून विकत घेण्याकडे स्टॉक्सची रेटिंग अपग्रेड केली. त्यानंतर कंपनीचा शेअर ६.५३ टक्क्यांनी वाढला आणि ६०४.७० रुपयांवर बंद झाला. देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने उच्चांकी पातळी गाठत ७३.८१ रुपयांचे मूल्य कमावले. सध्या सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला असून तो ३९३२८ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टीत ५८ अंकांची वाढ झाली असून तो ११६१५ अंकांवर आहे. विश्लेषकांच्या मते निफ्टी ११७५० अंकांचा स्तर गाठेल, असे पोषक वातावरण सध्या बाजारात आहे. कोव्हीड-१९ चा उद्रेक झाल्यामुळे गुंतवणुकादारांनी लार्ज कॅप मोमेंटम स्टॉकवर लक्ष केंद्रित केल्याने अमेरिकी शेअर्सनी उच्चांक गाठला. नॅसडॅकने १.७३ टक्क्याची वृद्धी घेतली. एशियन आणि युरोपियन स्टॉकने लाल रंगात व्यापार केला. निक्केई २२५ चे शेअर्स ०.३५ टक्क्यानी घसरले. हँगसेंगचे शेअर्स ०.८३ टक्क्यांनी घसरले. एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.२५ टक्के आणि ०.६३ टक्के घसरले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Qz9Zgx

0 Comments