
नवी दिल्ली: भारताची दिग्गज कुस्तीपटू गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिने देशातील सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव दिल्यावरून हल्ला चढवला आहे. बबीताने तिच्या शैलीने एक ट्विट केले असून जे सध्या व्हायरल होत आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराशी माजी पंतप्रधानांचे नाव जोडण्यावर बबीता फोगाटने आक्षेप घेतलाय. बबीताने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. राजीव गांधी यांनी एकदा भारतातून इटलीत भाला फेकला होता म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो का? वाचा- बबीताचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी दुपारी बबीताने हे ट्विट केले होते. त्यानंतर ते ११ हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे तर ६० हजारहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. बबीता फोगाट ही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बबीताने ३ वेळा पदक जिंकले आहे. ज्यात एका सुवर्ण आणि २ रौप्य पदकाचा समावेश आहे. त्या शिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले आहे.
देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार बबीताची बहिण विनेश फोगाटला मिळाला आहे. विनेशसोबत हा पुरस्कार रोहित शर्मा, मलिका बत्रा, राणी रामपाल, मरियप्पन थॅगावेलू यांना देण्यात आला आहे.

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gGg5GC
0 Comments